बाजार विभाग

लेखा विभाग

  • कर्मचाऱ्यांनी वसुल केलेल्या रक्कमा स्विकारून त्या बँकेत जमा करणे.
  • दैनिक रोजकिर्द, खतावणी व लेखा संबंधी रेकार्ड रोज अद्यावत ठेवणे.
  • मासीक जमा खर्च पत्रक, उत्पन्न खर्च पत्रक, ताळेबंद इत्यादी सहामाई, नवमाही, वार्षिक उत्पन्न खर्चाची पत्रके तयार करून मुदतीत वरिष्ठ कार्यालयास सचिवाचे मार्फत सादर करणे.
  • समितीचे अर्थसंकल्प , वार्षिक अहवाल अंशदान आकारणी, व्यवसाय कर, आयकर, कर्मचारी विमा, कर्ज प्रकरणे, कर्जाची हप्ते, पुरवणी अर्थसंकल्प इत्यादी लेखा विभागाची संबंधीत खात्याकडे भरणा करणे व मुदतीत माहिती मंजुरीस सादर करणे.
  • मंजुर अर्थसंकल्पाचे अधिन राहुन खर्चाची देयके मंजुरीस सादर करणे.
  • लेखा विभागाशी संबंधीत सर्व जमा पावती, पुस्तके, रोखड पुस्तके, खतावणी बुके, खर्चाची व्हावचर, हिशोबाची रजिस्टरे, स्थावर व जंगम मालमत्ता बाबत रेकार्ड इत्यादी आवश्यक रेकार्डची चोरी किंवा गहाळ अथवा खराब होणार नाही यांची दक्षता घेणे व आवश्यकते नुसार वरिष्ठ अधिकारी, लेखापरिक्षक तपासणी अधिकारी यांना वेळीच उपलब्ध करून देणे.
  • कर्मचारी पगार बिल तयार करून मंजुरीस सादर करणे. तसेच कर्मचारी भ.नि.नि. व इतर पगारातुन कपात केलेल्या रक्कमा जमा करणे.
  • मा. प्रशासक/सभापती/सचिव/सहाय्यक सचिव यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे व जबाबदारी पार पाडणे व सचिव व सहा. सचिव यांचे अनुपस्थित सचिव व सहा. सचिवांचे सर्व कामे व जबाबदारी हाताळणे.
  • इतर