एपीएमसी बद्दल

स्थापना

सिरोंचा कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना 3 जुन 2015 रोजी झाली असुन महाराष्ट्र कृषि उत्पन्ना खरेदी – विक्री (नियमन ) अधिनियम 1963 व त्या अंतर्गत तयार करण्यांत आलेले नियम 1967 नुसार बाजार समितीचे कामकाज प्रत्याक्षात दिनांक 8 जुन 2015 पासुन सुरु आहे.

समितीचे कार्यक्षेत्र

बाजार समितीचे कार्यक्षेत्र सिरोंचा तालुक्यातील गावापुरते आहे.

समितीचे मुख्याबाजार

समितीचे मुख्याबाजार आवार आसरअल्ली रोड कोत्तागुडम येथे असुन बाजाराचे क्षेत्र 0.81 हे.आर आहे. मुख्य बाजार आवारात 200,500,1000 मे.टनाचे असे तिन गोदामे बांधलेले आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी, नळ व बोरींग बांधकामे केली आहे. तसेच लिलावशेड ओपन ओटे स्वच्छतागृह पुरुष व महीला साठी वेगवेगळे दोन्ही बाजुन संरक्षण भिंत असुन सिमा बंद केल्या आहेत. तसेच इंलेक्टानिक वजन काटयावरती वजन व्हावे यासाठी बाजार समितीने इंलेक्टानिक वजन काटे पुरवीलेले असुन बाजार समितीचे आवारात 80 मे.टनाचे भुईकाटे बसविण्यांत येणार बाजार समितीचे दैनिक कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी दैनिक बाजार भाव भरण्यासाठी संगणकाची खरेदी केलेली असुन त्यावर कामकाज सुरु आहे.

समितीचे शेतकऱ्यासाठी तारण योजना सुरु केलेली करणार असुन मुख्य बाजार आवारात लवकरच शेतकऱ्यासाठी स्वस्त दरात भोजन पुरविण्यांची योजना सुरु करण्यांचा विचार आहे. तसेच येणाऱ्या वर्षात सिमेटीकरण करुन शेतमालाच्या नासाडीवर नियंत्रण करण्यांचा विचार आहे.

नियंत्रित शेतीमाल

समितीचे कार्यक्षेत्रात या बाजार समितीनी खालील शेतीमाल नियंत्रणाखाली आणलेले आहे. वटाना, येरंडी, तिळ, सोयाबिन, कापुस, मिरची, बरबटी, कुलधा, ज्वारी, धान, तांदुळ, सुर्यफुल , मुंग ,वाल, चवडी, तुर, मोट, मक्का, गुरेढोरे, शेळयामेढया ईत्यादी नियंत्रित शेतीमालाची घोषणा केली आहे.

या बाजार समितीचे 25 टक्के कार्यक्षेत्र जंगलानी व्यापले असल्याने शेतीउपयोगी जमीन फक्त 75 टक्के एवढी असुन त्यातही या भागात सिंचनाची सोयी असल्याने या भागातील शेतकरी रोखीचे पिके घेतात हया भागात भाताची व कापुसाची जास्त प्रमाणात आवक होते समितीकडे व्यापारी नसल्यामुळे खेडापध्दतीने खरेदी केल्या जाते. त्यावर बाजार समितीचे पुर्णत: नियत्रत असते.